आपचा निर्धार राहुल दादा कलाटे आमदार

0
58

वाकड, दि. १७ – आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड वतीने बर्ड व्हॅली वाकड येथे 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे इंडिया फ्रंट आघाडीचे अधिकृत उमेदवार कलाटे राहुल तानाजी यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी जोमाने काम करा असे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मीनाताई जावळे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे घराणेशाहीच्या विरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहुल दादांना सर्वांनी विजय करण्यासाठी दिवस रात्र एक करा असे सांगितले, युवक शहराध्यक्ष रविराज दादा काळे यांनी यावेळी असे म्हटले की आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल साहेब यांनी इंडिया आघाडी सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तो देशाच्या हिताचा आहे आणि त्यासाठी सर्व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करणे गरजेचे आहे आपले सर्व इंडिया आघाडीचे उमेदवार बहुमताने विजयी करणे गरजेचे आहे तरच महाराष्ट्रावर हे जे भाजप रुपी आलेले संकट दूर होईल महाराष्ट्रातुन उद्योग गुजरातला जातात महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही, महाराष्ट्रातली लाडकी बहीण सुरक्षित नाही, चिंचवड मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार, चिंचवड करांना दोनवेळा पाणीपुरवठा कधी होणार, अशा बऱ्याच विषयांना हात घालत त्यांनी हे देखील सांगितले की भाजप घराणेशाहीला खतपाणी घालत आहे ज्या व्यक्तीचे स्वतःचे असे काहीच अस्तित्व नाही अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन चिंचवड विधानसभेची निवडणूक ही राहुल दादांसाठी आधीच सोपी झाली आहे. त्यांनी यावेळी राहुल कलाटे यांना असा विश्वास दिला आहे की चिंचवड विधानसभेचा निकाल 23 तारखेला आपल्याच बाजूने लागेल आणि यामध्ये आम आदमी पार्टी मुख्य भूमिकेत असेल.
राहुल कलाटे यांनी देखील आपली भूमिका मांडत असताना आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले व निवडून आल्यानंतर मी आम आदमी पार्टीकडे दुर्लक्ष करणार नाही अशी ग्वाही देखील दिली आणि चिंचवड चा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहील असे देखील त्यांनी सांगितले,
यावेळी आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्षा मिनाताई जावळे युवक शहराध्यक्ष रविराज काळे, वैजनाथ शिरसाट, सचिन पवार,संतोष इंगळे, स्वप्निल जेवळे,सोनाली झोळ,बावणकर,आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.