आनंदा कुदळे यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

0
33


दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे यांना ‘सावित्री शक्तीपीठ’ या संस्थेचा ‘महात्मा फुले पुरस्कार’ जाहीर झाला आहे. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४ ऑगस्ट) समताभूमी, महात्मा फुले पेठ, पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुदळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आनंदा कुदळे यांनी सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरण, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी कुदळे यांना मिळाली होती. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथील महात्मा जोतीराव फुले स्मारक आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीत कुदळे यांचे उल्लेखनीय योगदान आहे. काँग्रेस सेवादल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक संरक्षण समिती, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नागरी हक्क सुरक्षा समिती, महात्मा फुले जनसेवा मंडळ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, रयत शिक्षण संस्था महात्मा फुले विद्यालय पिंपरी स्थानिक शाळा समिती, महात्मा फुले ट्रस्ट,
पोलीस मित्र संघटना, अजिंक्य मित्र मंडळ, विघ्नहर्ता न्यास पिंपरी पोलीस स्टेशन, ओबीसी महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, महाराष्ट्र माळी महासंघ, महात्मा फुले मंडळ अशा विविध संस्थांवर आनंदा कुदळे यांनी पदाधिकारी म्हणून काम केले आहे.