दीड कोटी शिधापत्रिका धारकांचा पाडवा दुःखात.
पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – महाराष्ट्र शासनाने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांमध्ये “आनंदाचा शिधा ” देण्याची घोषणा शिंदे – फडणवीस सरकारने केली, मात्र नियोजन नाही सवंग प्रसिद्ध प्रसिध्दी मिळवली मात्र गोरगरिबांना,कष्टकऱ्यांना शिधा मिळालाच नाही , सरकारने १ कोटी ६३ लाख रेशन कार्ड धारकांची फसवणूक केली आणि त्यांचा पाडवा दुःखात गेला याचा निषेध करतो अशी टिका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
आनंदाचा शिधा मिळाला नाही यावर शिधापत्रिका धारकांनी नाराजी व्यक्त केली याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज निषेध करण्यात आला. कामगार नेते काशिनाथ नखाते,राज्य उपाध्यक्ष राजेश माने, इरफान चौधरी, भास्कर राठोड, अनिता जाधव, माधुरी वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की राज्य शासनाने यापूर्वीच्यासुद्धा भर दिवाळीमध्ये अशा प्रकारच्या आनंदाचा शिधा देन्याची घोषणा केली त्याही वेळी किट वरती महोदयांचे फोटो लावायचे म्हणून त्यास उशीर झाला आणि आताही गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो चणाडाळ, १ लिटर पाम तेलचे किट १०० रुपयांमध्ये देण्याची सवंग घोषणा करण्यात आली मात्र प्रत्यक्षात मात्र धान्याचे किट द्यायचं नाही असे धोरण आहे . शहरातील साधारण १ लाख १५ हजार रेशन कार्डधारक या मागणीसाठी वारंवार रेशन कार्ड दुकानदाराकडे जात आहेत मात्र त्यांना निराशापोटी परत यावे लागते हे अत्यंत चुकीचे असून घोषणा केली तर प्रत्यक्षामध्ये आणली पाहिजे.