आधी भाजप पक्ष होता. आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झालीये -सुप्रिया सुळे

0
240

मुंबई , दि. १६ (पीसीबी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडे बोलायला काही उरलं नाही. त्यामुळे आता भाजप नेत्यांची दडपशाही सुरू असल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नसल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. आधी भाजप पक्ष होता. आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झाल्याचा खोचक टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. ज्यांनी भाजपला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठं आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांकडे बोलण्यासाठी आता काही उरले नाही, त्यामुळे त्यांची दडपशाही सुरू आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. भाजप आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉन्ड्री झाला आहे. ज्यांनी भाजपाला वाढवलं, संघटना मजूबत केली. अगदी माईक लावण्यापासूनची कामे ज्या कार्यकर्त्यांनी केली, ते कार्यकर्ते कुठे आहेत? असा खोचक सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना देखील खोचक टोला लगावला आहे. भाजपला ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढवण्याचं काम केलं ते कार्यकर्ते आज कुठे आहेत? मात्र त्यांच्या जागी आता आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये एवढा मान-सन्मान मिळत आहे, हे पाहून बरं वाटलं. आमच्याकडे देखील त्यांना काही कमी नव्हतं. मात्र बर झालं त्यांना दोन्हीकडं देखील सन्मान मिळत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.