दि.१०(पीसीबी)-अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात १९९१ साली घडलेले एक धक्कादायक हत्याकांड आजही जगभर चर्चेत आहे. इजिप्तमध्ये जन्मलेल्या २३ वर्षीय मॉडेल ओमायमा नेल्सन हिने आपल्या ५६ वर्षीय पती बिल नेल्सन यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे होते.
ओमायमा नेल्सन नावाच्या इजिप्तमध्ये जन्मलेल्या २३ वर्षीय मॉडेलवर तिच्या ५६ वर्षीय पती बिल नेल्सन यांची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, ओमायमा आणि बिल नेल्सन यांची ओळख हंटिंग्टन बीच, कॅलिफोर्निया येथील एका बारमध्ये झाली होती. काही दिवसांच्या ओळखीनंतर दोघांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर काही आठवड्यांतच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला.२८ नोव्हेंबर १९९१ रोजी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये दोघांमध्ये वाद झाला. ओमायमा नेल्सनने न्यायालयात सांगितले की, पतीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने त्यांच्यावर हल्ला केला.
तपासादरम्यान पोलिसांना घरातून अत्यंत धक्कादायक पुरावे मिळाले. बिल नेल्सन यांचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणामुळे संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती.न्यायालयीन सुनावणीनंतर ओमायमा नेल्सनला खुनाच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आणि तिला दीर्घकालीन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.या घटनेने त्या काळात जगभरात मोठी चर्चा निर्माण केली होती. घरगुती वाद, हिंसा आणि मानसिक तणाव यामुळे किती भीषण गुन्हे घडू शकतात, याचे हे एक अत्यंत धक्कादायक उदाहरण मानले जाते.










































