आदित्य ठाकरे ड्रग्ज बिझनेसमध्ये ?

0
6

मुंबई, दि. २५ : दिशा सालियनचा मृत्यू अपघाती नसून तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत वडिल सतिश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, याप्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे. त्याच अनुषंगाने आज दिशा सालियनचे वडिल सतिश सालियन यांच्यासह या प्रकरणात सतिश सालियन यांची बाजू मांडणरे वकील नितीन ओझा यांनी आज मुंबईत पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे वडिल उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

दिशा सालियन प्रकरणात नितीन ओझा यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. वकील नितीन ओझा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, नार्कोटेक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आलंय आदित्य ठाकरे हे ड्रग्स बिझनेसमध्ये सहभागी आहेत. त्यासंदर्भाती इतंभू माहिती आम्ही या अर्जात दिली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएफीपी नावाची कंपनी होती,जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती.

आदित्य ठाकरे यांचं नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नार्कोटेक्स ब्युरोचे इतर अधिकारी असतील, त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवलं, असा सवाल नितीन ओझा यांनी विचारला आहे. त्यामध्ये, किती कोटींची डील झाली असाही सवाल ओझा यांनी विचारला आहे. पोलिस आयुक्तालयात आमची जॉईंट सेक्रेटरी यांच्यासोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा करुन संबंधित प्रकरणात ही तक्रार दाखल करुन घेत असल्याचे म्हटले. त्यानुसार, आता एफआयआर दाखल झाल्याचेही ओझा यांनी सांगितले. आमच्या तक्रारीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आरोपी आहेत, अशी माहिती ओझा यांनी दिली.

11 डिसेंबर 2023 साली सतिश सालियन यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलंय. त्यामध्ये, त्यांनी केस रिओपन करुन चालवण्याची मागणी केली आहे. याशिवाय आमच्याकडे आय विटनेसही आहेत. दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे तिथं होते की नाही? आणि दुसरं म्हणजे दिशाचा मृत्यू हा नैसर्गिक नाही. त्यामुळे, ही आरोपीची जबाबदारी आहे की, त्यांनी ते पटवून द्यावं हा मृत्यू नैसर्गिक नाही, असे नितीन ओझा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

स्टीव्ह पिंटो नावाचा दिशाचा एक मित्र आहे, त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये, 7 जून 2020 रोजी एकता कपूरच्या घरी पार्टी झाली, त्यांसदर्भातील सर्व हिंट्स दिल्या होत्या. तसेच, त्या दिवसापासून स्टीव्ह पिंटो हा गायब आहे, अशी माहितीही नितीन ओझा यांनी दिली. तसेच, आमची तक्रार खोटी निघाल्यास आम्हाला फाशी द्या, असेही आम्ही तक्रारीत लिहिल्याचे ओझा यांनी म्हटले.