आदर्शमाता कै. सौ.भागुबाई बळीराम कोकणे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रहाटणीत सात दिवस प्रवचनसेवा

0
306

रहाटणी, दि. ०६ (पीसीबी) – रहाटणी येथील जेष्ठ आदर्श माता कै.सौ. भागूबाई बळीराम कोकणे (वय ८५) यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. त्यानिमित्ताने रहाटणी येथील राहत्याघरी दररोज भजन व प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. गेली ७ दिवस ही प्रवचन सेवा चालू होती. या सेवेचा समारोप 6 ऑक्टोंबर रोजी ह.भ.प सतिश महाराज काळजे यांच्या प्रवचनाने झाला.

दशक्रिया दिवशी 7 ऑक्टोबर रोजी रहाटणी येथील शंकर मंदिर घाट येथे सकाळी 8 वाजता हभप संतोष महाराज काळोखे (देहूकर) यांचे प्रवचन होणार आहे. तसेच तेराव्या विधिनिमित्त मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत राहत्या घरी हभप संजय महाराज कावळे आळंदीकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.

कै.सौ.भागुबाई बळीराम कोकणे यांच्या निधनानंतर राहत्याघरी दररोज प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हभप शेखर महाराज जांभुळकर, हभप ऋषिकेश महाराज चोरघे, हभप रवि महाराज पवार, हभप महादेव महाराज भुजबळ, हभप पोपट महाराज इंगळे, हभप बोरकर महाराज शास्त्री, हभप सतिश महाराज काळजे यांसारख्या विविध नामांकित महाराजांची प्रवचन सेवा झाली.

यावेळी रहाटणी, देहूगाव, ओझर्डे, चाकण येथील समस्त, ग्रामस्थ भजनी मंडळांनी सेवा दिली व शालिनीताई पाटिल बहनजी यांची संत निरंकारी सत्संग यांची सेवा झाली.

रहाटणी त्यांचे माहेर आणि सासर तर देहु त्यांचे आजोळ होते. वारकरी सांप्रदायाचे बाळकडु हे लहानपणा पासुन लाभले आणि त्यांनी ते आयुष्यभर आचरणात आनले. आणि आपल्या परिवाराला देखील ते दिले.

पती बळीराम कोकणे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी नेटाने संसार थाटला. त्यांना तीन मुले मगन,ज्ञानेश्वर,रमाकांत यांना त्यांनी योग्य शिक्षण दिले व स्वतःच्या पायावर उभे रहायला शिकवले आणि मुलांनेही विविध व्यावसायांच्या माध्यमातुन समाजात नावलौकिक साध्य केले व उद्योजक कुटंब म्हणुन नावारूपास आले. तर चार मुली पार्वती, गिरीजा,नलीनी व उज्वला यांना देखील मोठ्या नामांकित व सांप्रदायिक कुटुंबात दिले. त्यांनी मुलींवरती योग्य ते संस्कार केले म्हणुन सर्वच मुली आज विविध क्षेत्रात चांगल्या पध्दतीने काम करत आहेत. नलीनीताई भोईर या सत्संगाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करतात तर उज्वालाताई जाधव या लायन्स कल्बच्या माध्यमातुन सामाजिक कार्य करत आहेत. चार नातवंडे नितीन,धनंजय,ऋतिक व श्रृती हे वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रीय काम करत आहेत. नितीन हे उद्योजक, धनंजय हा वकिल, ऋतीक हा व्यावसायिक तर नात श्रृती ही आर्किटेक्ट आहे.