आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पिंपरी चिंचवडची धुरा

0
3

दि. ६ – वीस वर्षे अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व केले आता ही धुरा त्यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. विविध प्रश्नांच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली आणि प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त शेखर यांच्या समवेत चर्चा केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक माया बारणे, अतुल शितोळे तसेच प्रवक्ते फजल शेख, मनिषा गटकळ आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची व समस्यांची दखल घेऊन आयुक्तांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.