आता वाल्हेकरवाडीत दोन होरपळून गेले, सलग तिसरी घटना

0
172

पिंपरी,दि. २३ (पीसीबी) – पुण्यात काल रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. भाविकांनी दिव्यांची आरास, फटाके फोडून आपला उत्साह आनंद साजरा केला, मात्र, या उत्साहात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. तब्बल चार ते पाच ठिकाणी आगी लागल्या. तर पिंपरी चिंचवड इथे वाल्हेकर वाडी येथे रात्री २:२५ च्या दरम्यान एका लाकडाच्या गोदामाला व दुकानाला लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेला दोन भावांचा होरपळून मृत्यू झाला.

गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज ( लाकडाची वखार), मे.विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर मेकिंग कंपनी या दुकांना आग लागली. यात एकूण ३ जण आगीत अडकले होते त्यातील ललित अर्जुन चौधरी (वय २१), कमलेश अर्जुन चौधरी (वय २३) या भावांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. आधी २ जण आगीतून बाहेर आले होते एकाने लोकांना गोळा करण्यास गेला तर एकाने आपल्या भावाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न मध्ये दोन्ही भावांच मृत्यू झाला.

वाल्हेकरवाडी येथील पत्राच्या शेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. तर दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते. गोडाऊन मध्ये लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे असल्याने आग वेगाने पसरली. ही आग बाजूला असणाऱ्या गोडाऊन मध्ये देखील पोहचली. तसेच शेडच्या बाजूला टेम्पो व एक चार चाकी वाहन उभे होते. त्या हि पूर्णपने जळून गेल्या आहेत. मागील बाजूस इमारत होती त्याचे दरवाजे हि आगेच्या संपर्कांत आल्याने जळाले आहे.

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझविली. गोदामाच्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीमधील सर्व रहिवासांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण आगीचे कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०४ अग्निशमन केंद्रातील एकूण ५ अग्निशमन वाहनांसह जवळपास ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

सदर कामगार लोक आगीच्या ठिकाणी जळलेला साहित्य बाहेर काढताना दिसतात. अशाच पध्दतीने पुर्णानगर येथे हार्डवेअरच्या दुकानात पोटमाळ्यावर झोपलेले चार जणांचे आख्खे एक कुटुंब चार महिन्यांपूर्वी होरपळून संपले. अत्यंत दुर्दैवी अशा त्या घटनेनेंतर पोटमाळ्यांचे सर्वेक्षण करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंह यांनी त्यासाठी ठोस पावले टाकली होती. प्रत्यक्षात फक्त अग्निशामक विभागाचे ना हरकत दाखले किती जणांनी घेतले त्याचे सर्वेक्षण झाले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तळवडे-रुपीनगर येथील एका फटाक्यांची दारू असलेल्या कारखान्याला आग लागली आणि त्या दुर्घटनेत ९ महिलांची आगीत खाक झाली होती. दोन्ही घटनांचा अननुभव असतानाही प्रशासन आणि विशेषतः अग्निशामक विभागाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. बेकायदा पत्रा शेडववर कारवाई करण्यात येते, पण पोटमाळ्यांची दुकाने आजही आहे तशीच आहेत. सलग तीन घटनांतून प्रशासन काही शिकणार आहे की नाही, असा प्रश्न नागरिक करत आहेत.