आता राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही

0
325

दिल्ली, दि.11(पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. निवडणूक आयोगाने विशिष्ट राज्यांमध्ये जनाधार असलेल्या पक्षांना राष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. अलिकडच्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी पक्षाचा हा दर्जा संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राबाहेर अस्तित्व दुबळे आहे. छोट्या राज्यामध्ये नुकतेच या पक्षाचे आमदार निवडून आले होते.

दरम्यान,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडले आहे. मुंबई-पुणेसह 25 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद, 207 नगरपालिका निवडणुका पुन्हा अधांतरी झाल्या आहेत.

सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी सुनावणी झाली नाही. महाराष्ट्र सरकारने आजही बाजू मांडण्यासाठीहकाही वेळ मागितल्यानंतर प्रकरण 3 आठवड्यासाठी लांबणीवर पडले.