आता मंत्रीमंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता

0
302

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत रोज नवनवीन तारखा सुरू होत्या, पण आता मुहूर्त ठरला आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याती शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता विस्ताराचा मुहुर्त ठरला असून पावसाळी अधिवेशनही १० ते १७ ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधिमंडळातील अधिकाऱ्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्रील एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे. पावसाळी अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या मंत्र्यांचा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या कामाला मुहूर्त मिळाला तर राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या कामाला वेग येणार आहे.