– भाजपचे किरीट सोमय्या, प्रविण दरेकर यांच्या पाठोपाठ लाड सुटल्याने भाजप पक्षासाठी सरकारी यंत्रणा काम करते का असा सवाल
मुंबई, दि. १७ (पीसीबी) – भाजपा आमदार प्रसाद लाड यांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्याचा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास आता बंद करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते आहेत. यामुळे भाजप पक्षासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहे का असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.
प्रसाद लाड यांच्यावर 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात त्यांच्यावर 2014 मध्ये मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.
ईओडब्ल्युने आपल्या सी समरी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे, प्रसाद लाड यांच्याविरुद्ध खटला पुढे नेण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही, असा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. यामुळे प्रसाद लाड यांना दिलासा मिळाला आहे.