आता धनंजय मुंडेंचे पुनर्वसनसुध्दा ठरले

0
5

दि . ४ ( पीसीबी ) – आजारपणाच कारण पुढं करत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना कार्यमुक्त केल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. धनंजय मुंडेंची आमदारकी सध्यातरी रद्द होणार नाही असं राजकीय गोटातून सांगण्यात येत आहे.

मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वाचं लक्ष वेधलं आहे. अशातच, धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला पण पुढे काय होणार? याचा सवाल उपस्थित होत आहे. तर मुंडे यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असताना मुंडेंनी स्वतः ट्विट करत राजीनाम्याचं कारण वैद्यकीय असल्याचे सांगितलं. त्यांचे हे ट्विट पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजीनाम्याच्या कारणांमध्ये विसंगती पाहयला मिळत असल्याने राजीनामा नेमका कशासाठी घेण्यात आला हे अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट कराव असी मागणी खासदार सुप्रिया सुळं यांनी केली आहे. दरम्यान, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आमदारकी रद्द होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

धनंजय मुंडेंचे मंत्रिपद गेले असले तरी आगामी काळात संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांना अभय दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. मुंडे यांच्याविरोधात चार्जशीटमध्ये कोणताही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही. त्यामुळं मात्र धनंजय मुंडेंची आमदराकी सध्यातरी रद्द होणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येत होता. मात्र, काल दि. 3 संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.