आता तालिबानचीही भारताला धमकी, मुस्लिमांच्या भावना भडकावू नका

0
251

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताला आखाती देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं असून सौदी अरेबियानेही निषेध नोंदवला आहे. त्यातच आता तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तान सरकारनेही भारताला धर्मांधतेवरुन सुनावलं आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी भारताला मुस्लिमांच्या भावना भडकावू नयेत, अशी विनंती केली आहे.

“आम्ही भारत सरकारला विनंती करतो की, अशा धर्मांधांना इस्लाम धर्माचा अपमान करु देऊ नका आणि मुस्लिमांच्या भावना भडकावू नका,” असं तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजैद म्हणाले आहेत.