आता जयंत पाटील सुध्दा भाजपच्याच वाटेवर

0
495

मुंबई,दि.२४(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट) भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा अनेक दिवसापासून आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सांगलीत सूचक विधान केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान जयंत पाटील यांच्या सहकाऱ्यांवर ईडी छापे पडल्याने त्यांचे समर्थक हादरले असून ते सर्वजण आता भाजपच्या वाटेवर आहेत.

“भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच जयंत पाटलांचा प्रवेश होईल,” अशा शब्दात खासदार संजयकाकांनी जयंतरावांच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले आहे.
महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “जयंत पाटलांचा भाजपा प्रवेश होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.