दि.०२(पीसीबी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज, 2 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाले. पुणे शहरात मात्र नागरिकांना मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडणे आणि बिबट्याची दहशत यासारख्या अडचणींचा सामना करावा लागला.पुणे जिल्ह्यातील 12 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींमध्ये मतदान संथ गतीने सुरु झाले, पहिल्या चार तासांत फक्त 20.22% मतदान झाले. वडगाव मावळमध्ये सर्वाधिक 28.33% मतदान, तर दौंड नगर परिषदेत सर्वात कमी 13.21% मतदान नोंदवले गेले.
राज्यातील निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे ठरले आहे, त्यामुळे बहु-टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील टक्कर रंगली असून, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह इतर राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षही मैदानात आहेत.मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून, मतदार ओळखपत्रांची कडक तपासणी आणि “डबल स्टार” चिन्हांकित संशयित डुप्लिकेट मतदारांची तपासणी करण्यासाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
कोणत्या मतदार संघात किती मतदान झालं?
दौंड – 13.21%
लोणावळा – 22.23%
चाकण – 23.60%
शिरूर – 13.23%
इंदापूर – 24.95%
जेजुरी – 21.03%
आळंदी – 24.54%
राजगुरुनगर – 17.24%
सासवड – 24.30%
तळेगाव दाभाडे – 16.28%
जुन्नर – 17.59%
भोर – 21.75%
वडगाव मावळ – 28.33%
मालेगाव बुद्रुक – 24.12%
मंचर – 27.83%
मतदानाला सुरुवातीस संथ गती असूनही, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.











































