आठ महिन्याच्या बाळाचा खून करत आईचा आत्महत्येचा प्रयत्न

0
307

चिखली, दि. १५ (पीसीबी) – आईने पोटच्या आठ महिन्याच्या मुलाचे नाक तोंड दाबून त्याचा खून करत स्वतःच्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी साडेचार ते साडे पाचच्या सुमारास चिखली येथील नेवाळे वस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी पतीने चिखली पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावर गेले असताना त्यांची पत्नी, आई, लहान बहिण व बाळ हे घरी होते. यावेळी पत्नीने त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाचे नाक- तोंड दाबून त्याचा खून केला. शेवटी तिनेही आपल्या हाताची नस कापून घेत स्वतःला बाथरूममध्ये बंद केले. घरच्यांनी तिला कसेबसे बाहेर काढत दवाखान्यात दाखल केले. चिखली पोलिसांनी पंचनामा केला असून अद्याप महिलेने एवढे टोकाचो पाऊल का उचलले याचा उलगडा झालेला नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.