आठ जणांकडून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न चौघांना अटक

0
6

वाकड, दि. २१ पीसीबी – आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला वाद मिटविण्यासाठी ताथवडे येथे बोलावून घेत बेदम मारहाण केली. तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. १८) रात्री घडली.

स्वप्नील भागवत बावणे (वय २०, रा. ताथवडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयराम पालवे (वय २१), पृथ्वी दहिफळे (वय २३), तुषार दयानंद मंदाडे (वय २०), मयूर राजेंद्र राठोड (वय १९), तेजस उर्फ विवेक गोरख शिरसाठ (वय १९), विजार ढवळे (वय २१), यश उर्फ अण्णा भाऊसाहेब देवडे (वय २१), आदित्य गौंड (वय २२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील यांचे मंगळवारी सकाळी जयराम पालवे आणि पृथ्वी दहिफळे यांच्यासोबत भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी आरोपींनी ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या पाठीमागील बाजूला बोलावून घेतले. तिथे स्वप्नील यांना बेदम मारहाण केली. लोखंडी हत्याराने त्यांच्यावर वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी तुषार मंदाडे, मयूर राठोड, तेजस शिरसाठ आणि यश देवडे या चौघांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.