… अन्यथा मावळ व शिरूर मतदार संघात नोटा ला मतदान

0
298

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – रामदास आठवले साहेबाना शिर्डी मतदार संघ सोडलाच पाहिजे अन्यथा आम्ही मावळ व शिरूर मतदार संघात नोटा ला मतदान करू, असा इशारा रीपाई पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सुरेश निकाळजे यांनी दिला आहे. प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात,
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकित शिर्डी लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.राज्यात भाजप,शिवसेना या युती सोबत रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने युती केल्या नंतर युतीची महायुती झाली. भाजप,शिवसेना,रिपाइं ची दोस्ती 12 वर्षापासून मजबुत आहे.

दरम्यान च्या काळात पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले आहे.शिवसेने मध्ये उभी फुट पडली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या हाती शिवसेनेचे धनुष्य आले आहे.शिवसेनेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी एकनाथ शिंदेंवर श्री रामाची कृपा व्हायला हवी. श्री रामाच्या आशीर्वादासाठी एकनाथ शिंदेनी अयोध्येची वारी केलेली आहे.महायुतीच्या विजयासाठी श्री रामाची कृपा होईलच .पण महायुतीच्या मदतीला आर.पी.आय चे रामदास आठवले देखील धावून आलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उभी फुट पडली आहे.राष्ट्रवादीचे घड्याळ आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हाती आले आहे. त्यामुळे आता महायुती मध्ये मित्र पक्षांची संख्या वाढली आहे. महायुतीच्या जागावाटपाचे गणित आता अवघड झाले आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे.त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचे गणित भाजपच्या हाती आहे.रिपब्लिकन पक्षाची जागेची मागणी महायुती मध्ये भाजपच्या कोट्यात आहे.रिपब्लिकन सुप्रिमो रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सोडावा अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नडा,गृहमंत्री अमित शहा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे नवे भागीदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही केली आहे.अद्याप महायुतीतुन रिपब्लिकन पक्षाला शिर्डी मतदार संघ सोडण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.नेत्यांनी निर्णय घेतला नसला तरी ना.रामदास आठवले यांच्या दावेदारीमुळे शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेने त्यांच्या दावेदारीचे स्वागत केले आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महायुतीच्या घटक पक्षातील अनेकांनी ना.रामदास आठवले यांच्या दावेदारीचे हार्दिक स्वागत केले आहे. रिपब्लिकन पक्षाने तर आनंदोत्सव साजरा केला आहे. संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदार संघात रामदास आठवले यांच्या नावाने हर्षउल्हास होत आहे. केंद्रिय मंत्रीमंडळातील मंत्री म्हणुन शिर्डी मतदार संघाला ना.रामदास आठवले भरिव निधी आणुन विकास कामे चांगली करु शकतात.

रामदास आठवले हे अजातशत्रु नेते आहेत. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी त्यांचा सुसंवाद आहे.2009 साली लोकसभा निवडूनकित शिर्डी मध्ये ते उपविजेते ठरले. मात्र त्यांनी हार कधी मानली नाही. ते सतत शिर्डी लोकसभा मतदार संघात जनतेच्या संपर्कात राहिले. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सामील होत राहिले.
महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाची गुरुकिल्ली उपमुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्या हाती आहे. महायुतीमध्ये सबका मालिक एक देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी निर्णय घेतला तर महायुतीच्या जागा वाटपात शिर्डीची जागा रिपब्लिकन पक्षाला निश्चित मिळेल. खरे तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात शिर्डी आणि सोलापुर या दोन जागा महायुतीने सोडल्याच पाहिजेत.याचा संपूर्ण देशात एन.डी ऐ.चा घटक पक्ष म्हणुन भाजपला निश्चित लाभ होईल.संपूर्ण देशात रामदास आठवलेंचा फार मोठा चाहता वर्ग आहे.देशभरात सर्व जातीधर्मियां मध्ये रिपब्लिकन चळचळ रामदास आठवलेंनी पोहोचवली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन वारसा रामदास आठवले देशभर चालवित आहेत.त्यांच्यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघ सोडला तर संपूर्ण देशात भाजपचा फार मोठा चांगला संदेश जाईल.शिर्डी ही श्री साईबाबांची भुमी आहे.साईबाबांनी सबका मालिक एक हा सर्वधर्मसमभावाचा संदेश दिलेला आहे.संघर्षनायक रामदास आठवले हे सर्वधर्मसमभाव जोपासणारे झुंजार नेते आहेत.शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्व जाती धर्मीयांना समान न्याय देण्यासाठी रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदार संघाला लोकप्रतिनिधी म्हणुन चांगला न्याय देऊ शकतील यात शंका नाही.त्यांच्या दावेदारीचे स्वागत जललेषात झाले आहे.सर्वांचे लक्ष रामदास आठवलेची उमेदवारी जाहिर होण्याकडे लागले आहे.संपूर्ण भारत देशाचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण याकडे लक्ष लागले आहे.