आठवडे बाजारात सोन सकाळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

0
136

आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडले आहे. हे घटना रविवारी (दि.26) तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात घडली.

हंबीरराव धर्मा सुकळे (वय 30 भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या पकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दुराई पंडियान वेंकटा सुबिय्याह तेवर (वय 37 रा तळेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी मुलगी व फिर्यादी यांच्या मित्राची पत्नी हे बाजारात भाजी घेण्यासाठी गेले होते. यावेळी फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची चार ग्राम वजनाची सोन्याची चैन आरोपीने जबरदस्ती तोडून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.