दि. २९ (पीसीबी) : मराठा आंदोलकांनी मैदाना तुडुंब भरलं आहे. मुंबईत आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची त्सुनामी आली आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी आहे. तर सगेसोयरे हा अध्यादेश लागू करण्याची सुद्धा मागणी आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आता मागे हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सरकारने आता या प्रकरणाचा एकदाचा तो सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान उपोषणाची सुरूवात होताच बीड मधील दोन आमदारांनी तातडीने सभास्थळी धाव घेत जरांगेंशी चर्चा केली.
बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाशदादा साळुंके हे दोन आमदार तातडीने उपोषणस्थळी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अगदी काही वेळातच दोन्ही आमदार तिथे पोहचले. त्यांनी यावेळी जरांगेशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. यापूर्वीही या दोन्ही आमदारांनी जरांगेच्या मोर्चांना आणि आंदोलनांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आझाद मैदानावर बीडचे दोन आमदार जरांगेंच्या उपोषणस्थळी पोहचले. मनोज जरांगे हे सर्व समाजासोबत आहे. सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. तर आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होणार जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस मुद्दामहून चालढकल करत आहेत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर निकाली काढावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.