आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात

0
109

दि. 3 ऑगस्ट (पीसीबी) – पालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या समवेत पिंपरी विधानसभेतील विकास कामाच्या बाबत आढावा बैठक घेतली.यामध्ये ट्रान्सपोर्ट नगर,चिंचवड MIDC मधील अंतर्गत रस्ते,प्राधिकरण मधील संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर उद्यान,बोपखेल ते खडकीला जोडणारा उड्डाणपूल, बोपखेल मधील आरोग्य केंद्र,पवना नदीवरील पूर नियंत्रण सीमाभिंत,पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न,पिंपरी भाजी मंडई मधील प्रस्तावित विकासकामे,पर्यटनाच्या दृष्टीने होत असलेली विकासकामे या सर्व कामांचा आढावा घेतला ती सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.आजच्या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घुले उपस्थित होते.