पिंपरी, दि. ११ (पीसीबी)- आज कासारवाडी येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती सकाळी ८ – ८.१५ वा च्या आसपास झाली. त्यावेळी साधारण २० ते २५ नागरीक पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले होते. क्लोरीन गॅसची गळती झाल्याचे लक्षात येताच नागरीकांना बाहेर काढण्यात सुरवात करण्यात आली. काही नागरीकांनी सौ.आशा धायगुडे शेंडगे यांना कळवताच त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रथम श्री. विजयकुमार थोरात साहेब (अग्निशामक दल प्रमुख ), श्री. उमेश ढाकणे साहेब ( ह प्रभाग क्षेत्रीय प्रमुख ), मा. मिनीनाथ दंडवते साहेब – साहय्यक आयुक्त (क्रिडा विभाग प्रमुख) व मा. प्रदीपकुमार जांभळे पाटील साहेब – अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला आणि प्रशासकीय यंत्रणा कामास लावली.
युवराज सोनवणे व अभिजीत कट्टे यांना सौ. आशा धायगुडे शेंडगे यांनी सुचना करून त्रास होणाऱ्या नागरीक व जीव रक्षक यांना त्वरीत वाय. सी. एम. रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले .
नंतर जलतरण तलावात जावुन महीला नागरीकांच्या बॅग त्यांच्या स्वाधीन करुन त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली.दरम्यान आजुबाजूस असणाऱ्या नागरीकांना काही त्रास होत आहे का नाही याची माहीती घेण्यासाठी मा. मिनीनाथ दंडवते साहेब, मा. उमेश जाधव व सौ आशा धायगुडे शेंडगे यांनी रेव्हु इस्टेट, सरीता गार्डन, ज्ञानराज विद्यालय येथे जावुन नागरीकांची विचारपुस केली. तसेच वाय. सी. एम. रूग्णालयात मा. विजयकुमार खोराटे साहेब- अतिरिक्त आयुक्त यांच्या बरोबर जावुन वाय.सी.एम. रुग्णालयातील दाखल झालेल्या नागरीकांची भेट घेतली. त्यावेळी एक १० वर्षांच्या मुलीची बिर्ला हॅास्पीटल मघ्ये हालवण्याची व्यवस्था करून होणाऱ्या बिलाची रक्कम महानगरपालिकेने आदा करावे अशी मागणी केली व ती मा. शेखर सिंह साहेब- आयुक्त पिं. चिं. मनपा यांनी मान्य केली. सुदैवाने सर्व रूगण्यातील दाखल नागरीक सुखरूप आहेत.