आजारी खासदार गजानन किर्तीकर यांची मुख्यमंत्र्यांकडून घरी जाऊन विचारपूस

0
522

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – पायावर शस्त्रक्रिया झाल्याने विश्रांती घेत असलेल्या शिवसेना खासदार गजानन किर्तीकर याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजानन कीर्तिकर हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गजानन कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरीच आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले. सगळ्यांच्या उपस्थित दोघांमध्ये चर्चा झाली. कीर्तिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान शिवसेनेचे लोकसभेचे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी या बंडखोर खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे आणि 12 खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं शिवाय भावना गवळींचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे