आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या घेतल्या, समोरून येणाऱ्या गाडीने चिरडले, मृत्यूचे तांडव!

0
2

दि. 22 (पीसीबी) – जळगाव येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने चिरडले. या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय? आग कशामुळं लागली?

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक दाबल्यामुळं पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकतून धुर आला अशी अफवा पसरल्यामुळं अनेक प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारली. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने समोरुन येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. ही घटना जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेत सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. 

पुष्पक एक्सप्रेस जेव्हा परांडा रेल्वे स्थानकाजवळ येत होती. त्यावेळी मोटरमनने ब्रेक दाबला. त्यावेळी एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिणक्या उडाल्या. त्यामुळं प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसली. या अफवेमुळं प्रशांमध्ये एकच गोंधळ उडाला. 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या असल्याची माहिती समोर आली आहे. 

रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी बचाव पथक पोहचले असून मदतकार्य सुरु आहे.