आकुर्डी मधील लेबर कॅम्पमध्ये टोळक्याचा राडा

0
628

आकुर्डी, दि. ६ (पीसीबी): आकुर्डी मधील ओम साई सदगुरू या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्प मध्ये पाच जणांनी मिळून पाच जणांना बेदम मारहाण केली. तसेच एका कारची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडे अकरा वाजता घडली.

निलेशकुमार रामसुमेर शर्मा (वय 27, रा. आकुर्डी), नैनेशकुमार श्रीरामराज, महेंद्रकुमार श्रीचंद्रशेखर आणि दोन महिला यामध्ये जखमी झाल्या आहेत. निलेशकुमार यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोट्या, विकी भिसे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर घराबाहेर जाऊन नैनेशकुमार श्रीरामराज, महेंद्रकुमार श्रीचंद्रशेखर आणि दोन महिला यांच्यावर दगडफेक करत त्यांना जखमी केले. यामध्ये कंत्राटदार शंकर काळे यांच्या कारची तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.