आकुर्डीत ३५ फुटी रावणाचे दहन

0
11

पिंपरी – शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने विजयादशमी निमित्त ३५ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. तसेच प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची अश्वरथ व ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटक मिलिंद देशपांडे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे, उद्योजक रवींद्र नामदे, विठ्ठल साखरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर, सागर धुमाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमोद कुटे यांच्या वतीने दवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयादशमी निमित्त प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची अश्वरथ व ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सीता हरण, रावण वधाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. त्यानंतर ३५ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. देखावा, मिरवणूक आणि रावण दहन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रमोद कुटे म्हणाले, आकुर्डीत मोठे, प्रशस्त रुग्णालय उभारले आहे. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार उपचार मिळत आहेत. या भागात सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते केले. पाळखी तळ, कमान केली आहे. पोलिसांच्या मदतीने परिसरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश आले आहे. या भागाचा आणखी विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदाचे शताब्दी वर्षे आहे. स्वयंसेवक पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि ‘स्व’बोध यासाठी कार्यरत आहेत. शताब्दी वर्षानिमित्याने संघातर्फे या पाच प्रमुख मुद्द्यांवर समाजजागृती करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटक मिलिंद देशपांडे यांनी सांगितले.