आकुर्डीत कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

0
466

आकुर्डी , दि. ६ (पीसीबी) : अर्धा तासांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केले. ही घटना आकुर्डीतील रामकृष्ण मोरे कॉलेजच्या गेटजवळ शनिवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

प्रणव गैरवरान्ना अर्जुन (वय 18, रा. बौद्धनगर, ओटास्कीम, निगडी) आणि दिगंबर अशी जखमी झालेल्यांची नावे असून प्रणव यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज अवधुत शर्मा ऊर्फ सोन्या (वय 20, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) याला अटक केली असून त्याचा साथीदार गोट्या शर्मा (वय 25) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोट्या शर्मा याचे फिर्यादी प्रणव याच्या सोबत अर्धा तासांपूर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून रामकृष्ण मोरे कॉलेजच्या गेटजवळ फिर्यादी प्रणव व त्याचा मित्र दिगंबर यांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्‍क्‍यांनी माहरण करीत कायेत्याने वार केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.