आकुर्डीतील एका हॉटेलच्या शौचालयात मोबाईल चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार उघड, वेटरवर गुन्हा दाखल

0
1463

निगडी , दि. २१ (पीसीबी) – आकुर्डीतील येथील गिता पावभाजी सेंटर या हॉटेलच्या शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.20) उघडकीस आला. एका नगारिकाने याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हॉटेलच्या वेटरवर गुन्हा दाखल केला आहे.

ईराण्णा शिवण्णा पांढरे असे गुन्गा दाखल झालेल्या वेटरचे नाव असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गौरव प्रकाश सुर्यवंशी (वय 28 रा.आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मित्र व ऑफीस मधील कर्मचाऱ्यासह गिता पावभाजी येथे जेवण्यासाठी गेले होते. फेरश होण्यासाठी फिर्यादी तेथील वॉशरुममध्ये गेले असता त्यांना आरोपीने त्याचा मोबाईल एका पेपरवर ठेवून चित्रीकरणाच्या उद्देशाने ठेवल्याचे निदर्शनास आले. हि धक्कादायक बाब उघडकीस येताच फिर्यादी यांनी थेट पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार केली. निगडी पोलिसांनी वेटरवर गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.