आई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी

0
458

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – आई आणि मुलीचा फोटो आणि अश्लील मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 30 जून 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला.

याप्रकरणी पिडीत तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत दिलीप गायकवाड (वय 32, रा. जेल रोड, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि त्यांच्या आईचा फोटोचा वापर करून अश्लील मजकूर आरोपीने सोशल मिडीयावर अपलोड केला. फिर्यादी तरुणी, त्यांची आई आणि भावाची पत्नी यांच्याबाबत आरोपीने अश्लील मेसेज केले. त्यांची सोशल मिडीयावर आरोपीने बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.