आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पााची मूर्ती ठेवायचीस…

0
231

– कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन, भावूक पोस्ट चर्चेत

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश समाज माध्यमांवर चर्चेत असतात. त्यांच्या विविध पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट अनेकांना प्रेरणा देतात. मात्र आता त्यांच्या पोस्टमुळे अनेकांना भावूक केलं आहे. कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन झालं आहे. त्याबाबात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पााची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलंस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. अश्यात तू गेलीस. हे सगळं मला अपेक्षित नव्हतं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही, असं कृष्णप्रकाश यांनी म्हटलंय.

माझी आई गेली. तिच्या विना मी भिकारी आहे, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलंय. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, आईचं निधन झालं अन् मी पोरका झालो, भिकारी झालो, असं कृष्णप्रकाश म्हणाले. “आई नेहमी आपल्यासोबत असते, आधी आपल्या आयुष्यात, नंतर कायमची आपल्या आठवणीत राहाते जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा आपल्याला स्वर्गात एक देवदूत मिळतो जो आपल्यावर लक्ष ठेवतो. मी माझ्या आईला गमावलं आहे. याचं दुख्: मी शब्दात सांगू शकत नाही”, असं कृष्णप्रकाश आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

माझी माँ के बराबर कोई नहीं… या कठीण काळात मला अनेकांचे सांत्वनाचे फोन आले. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद… मला अजूनही विश्वास बसत नाही की माझी आई देवाघरी गेली यावर… तिच्यासाठी प्रार्थना करा आणि माझ्या कुटुंबाला या अपार दुःखातून जाण्यासाठी धैर्य मिळो, अशीही पोस्ट कृष्ण प्रकाश यांनी लिहिली आहे