आई आणि बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल

0
196

नवी सांगवी, दि.४ (पीसीबी)- आई आणि बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी अडीच आणि रविवारी (दि. 31) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर नवी सांगवी येथे घडली.

निलेश रतन वंजारे आणि त्याची पत्नी (दोघे रा. संत तुकाराम नगर, नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलगा आणि सुनेने त्यांच्याशी वाद घालत हाताने मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादी यांची मुलगी रविवारी दुपारी फिर्यादी यांना बघण्यासाठी आली. त्यावेळी आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला काठीने मारहाण केली. तसेच ‘तुमचा काय संबंध इथं यायचा. तुम्हाला जिवे मारीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.