आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यावर कोयत्याने वार

0
2

भोसरी, दि. 16 (पीसीबी)

आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर एका तरुणाने त्याच्या चार ते पाच साधेधारांसोबत मिळून कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री दहा वाजताच्या सुमारास लांडगेनगर, भोसरी येथे घडली.

सहीर करीम शेख (वय 40, रा. भोसरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल भीमराव कांबळे (वय 21, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या सह त्याच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे आरोपी विशाल याच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात तसेच शेख यांनी विशाल याला रिक्षा दिली नाही. या कारणावरून त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून शेख यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.