आईला सिमेंटच्या गट्टूने मारहाण; मुलावर गुन्हा दाखल

0
97

वाकड, दि. 17 (पीसीबी) : दुसऱ्यांच्या घरात नेहमी डोकावून का बघत असतोस, असे विचारल्याने मुलाने आईला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पवार नगर, थेरगाव येथे घडली.

सतीश बबन वडमारे (वय 21, रा. पवार नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सतीश याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सतीश वडमारे याला दुसऱ्या लोकांच्या घरामध्ये का नेहमी डोकावून बघत असतोस असे फिर्यादी यांनी विचारले. त्याचा राग आल्याने सतीश याने फिर्यादीस शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने पायावर मारले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. वाकड पोलीस तपास करीत आहेत.