आईला मारहाण करणाऱ्या मुलाला अटक

0
116

देहूरोड, दि. 07 (पीसीबी) : भाडेकरू रस्त्यात गाडी लावतात, याबाबत जाब विचारल्याने मुलगा आणि सुनेने आईला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास देहूरोड येथे घडली.

याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा बिलाल खाजामिया सय्यद (वय 38, रा. देहूरोड) आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलाल याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा बिलाल याला त्याचे भाडेकरू रस्त्यात गाडी लावतात. त्यामुळे जाण्या येण्यासाठी अडचण होत असल्याबाबत जाब विचारला. त्या कारणावरून बिलाल याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तसेच सुनेने देखील मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.