-सरकारने आमच्याशी चर्चा करावी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये
-देशभरातील ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल
नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो बस ट्रक टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले असून, देशभरातील प्रवासी व मालवाहतूक चालक-मालिकांचे आंदोलन सुरू राहणार असून कोणीही माघार घेतलेली नाही. सरकारने आमच्याशी चर्चा करावी देशातील 25 करोड चालक-मालकांचं आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत.
“हिट अँड रन प्रकरणी दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंड तसेच राष्ट्रीय चालक आयोग, वेल्फर बोर्ड, ड्रायव्हर डे व इतरही प्रश्न महत्त्वाचे आहेत याच प्रश्नांवरती ड्रायव्हर आक्रमक झाले असून मूळ प्रश्नांवर चर्चा करावी. मोठे उद्योगपती ट्रान्सपोर्ट मालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले आहे, असे जाहीर करणे ही देशातील 25 कोटी चालक-मालकांची दिशाभूल आहे. ज्यांनी आंदोलन सुरू केले नाही ज्यांच्या आंदोलनाशी काही संबंध नाही. देशातील मोठे उद्योगपती भांडवलदार ट्रान्सपोर्टर्स यांना हाताशी धरून आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अधिक उग्र होईल, अशा इशारा मालवाहतूक प्रवासी चालक-मालकांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला आहे.
दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बाबा कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह दिल्ली येथे दाखल झाले असून आज दिवसभर आंदोलन सुरू राहणार आहे सायंकाळी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आह.
पिंपरी चिंचवड पुणे मुंबई महाराष्ट्र मध्ये आज प्रत्येक आरटीओ वरती आंदोलन केलं जाणार असून, लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन सुरू ठेवावे असे आवाहन दिल्ली येथून बाबा कांबळे यांनी देशभरातील प्रवासी व मालवाहतूक चालक मालकांना केले आहे.
बाबा कांबळे म्हणाले अनेक वर्षापासून देशभरातील ट्रक ड्रायव्हर बस ड्रायव्हर मोठे जड वाहतूक चालक-मालकांवरती अन्य अत्याचार होत आहे. रस्त्यावर त्यांना मारला जात आहे. याप्रकरणी त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग असून यात भर म्हणून सरकारने केलेला हा काळा कायदा यामुळे त्यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे. ड्रायव्हर वर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी राष्ट्रीय चालक आयोग निर्माण व्हावा ही आमची जुनी मागणी असून या बरोबरीने देशभरातील 25 कोटी चालक-मालकांना सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा म्हातारपणी पेन्शन मिळण्यासाठी वेफर बोर्ड निर्माण झाले पाहिजे. ड्रायव्हर डे साजरा केला पाहिजे देशासाठी बलिदान देणाऱ्या ड्रायव्हर यांचे स्मारक झालं पाहिजे असे इतर विविध प्रश्न महत्त्वाचे असून या प्रश्नांवरती चर्चा झाल्याशिवाय व समाधान झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. दिल्ली जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू राहील कोणीही गैरसमज करून आंदोलन मागे घेऊ नये हा लढा देशातील 25 कोटी चालक-मालकांचा असून चालक-मालकाने दिल्ली येथे जंतर-मंतर येथे यावे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपापल्या शहरातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करावे. कोणता हिंसाचार व रस्ता रोको करू नये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे असे आवाहन देखील बाबा कांबळे यांनी केले आहे.