मावळ, दि. २9 (पीसीबी)
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आंदर मावळ येथील कुसवली येथे “स्वरसंध्या” हा मराठी भावगीते व भक्ती गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सहारा वृद्धाश्रमाच्या (कुसवली) प्रांगणात सोमवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून टिव्ही स्टार लोकप्रिय बालगायिका आर्या लोहकरे हिने गायलेली लोकप्रिय सुमधूर गाणी मावळ वासियांना ऐकता येणार आहेत.
प्रसिद्ध तबला व पखवाजवादक जीवन भोपे, निवेदक विजय बोत्रे पाटील, तानाजी लोहकरे (हार्मोनियम) यांची या कार्यक्रमाला विशेष साथ लाभली आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून नव्या वर्षाचे स्वागत दूध पिऊन येथे साजरं केले जाणार असल्याची माहिती सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी दिली.