21 डिसेंबर रोजी जगभर 150 पेक्षा जास्त देशांमध्ये हा विश्व ध्यान दिवस गुरुदेव श्री श्री रविशंकर जी सोबत लाईव ध्यान करून उत्साहात साजरा झाला.
दि.२४(पीसीबी)-तसेच संत तुकाराम नगर केंद्र तर्फे सकाळी आर्च कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भोसरी मध्ये सर्व कामगार व ऑफिस कर्मचारी सर्वांसाठी योग आणि ध्यान सत्र आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक सचिन नाईक ह्यानी घेतले. हे जागतिक ध्यान दिवस सत्र कंपनी चे डायरेक्टर दत्तात्रय राठोड ह्यांनी आयोजित केले, तसेच कंपनी मध्ये येताच रोज थोडा वेळ ध्यान करवन्यात सुरुवात झाली आहे. सर्व सखोल शांती आणि कामामधे भरपूर ऊर्जेचा स्फूर्ति चा अनुभव करत आहेत.
तसेच संत तुकाराम नगर, पिंपरी येथील संत तुकाराम महाराज मंदिर सभामंडप मध्ये ही आर्ट ऑफ लिव्हिंग आणि समाजसेवक दिनानाथ जोशी ह्यांच्या उत्तम सहकार्याने विश्व ध्यान दिन उत्साहात साजरा झाला.
लहान मुले, तरुण, वयोवृद्ध सर्वानी सूक्ष्म योग, विशेष प्राणायाम, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आणि प्रोजेक्टर आणि स्क्रीन द्वारे गुरुदेव श्री श्री रविशंकर जी सोबत जगभरात होणारे लाईव ध्यान करून गहन शांती, उत्साह, स्फूर्ति चा अनुभव घेतला. हे सत्र प्रशिक्षक सचिन नाईक ह्यानी घेतले.
आयोजन लहान मुले स्वयंसेवक श्रीकुशी नाईक, कुश नाईक, मानसी इंगळे, मानवी इंगळे, शनय कांबळे, प्राकृति,अरनव,कीर्ति ह्यांचे विघ्नहर्ता बाल मित्र मंडळ आणि तरुण स्वयंसेवक शुभम सुतार, पवन पाटील, आदित्य तोड़कर, अपेक्षा नेटके, विजय दामोदरे, अमेय जोशी, रवी सकाटे, तेजस चौघुले, पल्लवी जाट ह्यानी केले आणि सोबत ह्या रविवारी सकाळी संत तुकाराम नगर येथील द येंजल इंटरप्रायजेस येथे आयुर्वेदिक नाडी परीक्षा, प्रसन्नता शिबीर आयोजित केले आहे. त्यासाठी ही सर्वाना आमंत्रित केले आहे.











































