आंंबेगाव तालुक्यातून देवदत्त निकम साहेबांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार

0
68

मंचर, दि. २० (पीसीबी) : शरद पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पायाभरणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच आज शरद पवार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी शरद पवारांनी वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

शरद पवार काय म्हणाले?
याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की त्यांनी देवदत्त निकम यांच्या बाबत अद्याप तरी विचार केलेला नाही. मात्र ज्या पद्धतीने एकेकाळी देवदत्त निकम यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालवला. त्यामुळे कर्तृत्ववान माणसाचं कर्तृत्व वाया जाऊ नये, याची विशेष काळजी घ्यायची आहे, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद पवार हे आज आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संकेत दिले आहेत.

माध्यमांनी शरद पवारांना विचारले की, दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या या तुमच्या पक्षाकडून लढणार आहेत. मात्र शरद पवार यांनी याबाबत निर्णय आमचे स्थानिक नेते घेतील. बाहेरच्यांनी उभे राहण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले. देवदत्त निकम यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देवदत्त निकम यांचे बाबत विचार केलेला नाही. मात्र एकेकाळी ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालवला, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यामुळे एखाद्या कर्तृत्ववान माणसाचे कर्तृत्व वाया जाऊ न देणे याची आपण विशेष काळजी घ्यायला हवी. असे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितले.