पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरांमधून मराठी बांधवांच्या नाय हक्कासाठी लढणाऱ्या मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी शहरातील माता-भगिनींनी बांधवांनी केली चपात्या व भाजी चटणीची रवानगी
सरकारने जरी हॉटेल बंद ठेवले असले तरी एकही आंदोलक उपाशी राहणार नाही अशी सोय पाठीमागे राहणारा मराठी बांधव करत आहे आज आम्ही 5000 चपात्या व चटणी भाजी घेऊन मुंबई येथे रवाना होत आहे
यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक संजयशेठ नेवाळे. काशिनाथ संभाजी जगताप
महेंद्र भालेराव, रावसाहेब थोरात, संदीप चव्हाण, अनिल भोसले, ज्योती गोफणे, ज्योती जाधव, श्री प्रतिष्ठान कृष्णा नगर, सुषमा भोसले श्री सिद्धिविनायक सेवा प्रतिष्ठान न्यू कृष्णा नगर आदींचा सहभाग आहे.