अ क्षेत्रीय कार्यालय व सँडविक कोरोमंड सीएसआर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे प्लॉगोथॉन मोहीम व शहर सुशोभीकरण उपक्रम चे आयोजन

0
353

आकुर्डी, दि. ०६ (पीसीबी) – अ क्षेत्रीय कार्यालय व सँडविक कोरोमंड सीएसआर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरणात प्लागोथॉन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील मनपाने नव्याने उभारलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या आसपासचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आला तसेच जुन्या टायर यांचा उपयोग करून परिसर सुशोभित करण्यात आला.

महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यात मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची व माझी वसुंधरा याबाबत शपथ देण्यात आल्या. यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे ;अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे , सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, सँडविक कोरोमंडचा सीएसआर ग्रुप आणि टीम बेसिक तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लालचंद मुथीयान , स्वयंसेवक,ज्येष्ठ नागरिक आदि उपस्थित होते.