अॅसिड फेकण्याची धमकी देत पाठवले अश्लील मेसेज

0
315

सचिन बाबू सोनवणे (वय 39, रा. अहमदनग) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेंद्र सोनवणे (वय 39, रा. अहमदनगर), दिग्विजय आबू सोनवणे (वय 19, रा. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या भाच्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर फिर्यादी यांची पटनी आणि मुलीबाबत अश्लील व शिवीगाळ केल्याचे मेसेज पाठवले. त्यानंतर जीवे मारण्याचे, अॅसिड फेकण्याचे धमकीचे मेसेज पाठवून अश्लील फोटो पाठवले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.