अहमदनगर ते चिंचवड प्रवासादरम्यान महिलेचे पावणेदोन लाखांचे सामान चोरीला

0
233

अहमदनगर ते मोहननगर, चिंचवड असा प्रवास करताना प्रवासी महिलेचे एक लाख 70 हजार 500 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अहमदनगर येथून चिंचवड येथे येण्यासाठी निघाल्या. सुरुवातीला त्यांनी इको कार आणि त्यानंतर मनपा बसने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांच्या पर्स मधून छोटी पर्स अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. त्यामध्ये एक लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, दीड हजार रुपये रोख रक्कम आणि एटीएम द्वारे काढलेले चार हजार रुपये असा एकूण एक लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.