अश्विनी जगताप यांंनी घेतली शपथ

0
242

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्र विधिमंडळा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरा आठवडा आहे. आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्राच अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीच विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप व रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आमदारकीचं शपथ घेतली.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक घेण्यात आली. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना १ लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांच्या राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मते मिळाली. यात जगताप यांचा ३६ हजार ७० मतांनी विजय झाला आहे. तिसऱ्या स्थानावरील अपक्ष राहुल कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळालेली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी श्रीमती जगताप यांचा विजय महत्वाचा समजला जातो.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांचा आज विधिमंडळ सभागृहात शपथविधी पार पडला. शपथविधि पार पडल्यानंतर आता या दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.