अश्विनी जगताप, नाना काटे, राहुल कलाटे यांनी बजाविला मतदानाचा हक्क

0
176

चिंचवड , दि. २६. – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान पार पडत आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजाविला आहे. पहिल्या दोन तासात 3.52 टक्के मतदान झाले.

अश्विनी जगताप यांनी कुंटुबियांसह पिंपळेगुरव येथे मतदानाचा हक्क बजाविला. सर्वांनी मतदानाला बाहेर पडावे. मतदान हा सार्वभौम हक्क आहे. आजपर्यंत लक्ष्मण जगताप यांना मतदान करत होते. आज स्वत:ला मतदान केले. दरवेळेला लक्ष्मण जगताप असायचे स्वत:ला मतदान करताना हूरहूर वाटली. मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. मतदार आमच्या कुटुंबाच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. दोन तारखेला उत्तर भेटेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी पिंपळेसौदागर येथील पी.के. इंटरनँशनल स्कूल शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. येणारी 2 तारीख ही आपलीच असेल. ही लढत भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला नक्कीच यश मिळेल,” अशी प्रतिक्रिया काटे यांनी मतदानानंतर दिली आहे.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सकाळी सहकुटुंब वाकडगावातील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्यासोबत आई कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. सर्वसामान्य जनता बरोबर असल्याने आपल्या विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया कलाटे यांनी दिली.