चिंचवड ,दि.०७(पीसीबी) – कंपनीत कामावर जाताना व घरी जाताना महिलेला अश्लील शायरीबाजी करत तसेच पाठलाग करत विनयभंग करणाऱ्या रोडवर मला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे हा सर्व प्रकार फेब्रुवारी 2023 पासून आज पर्यंत चिंचवड येथे विविध ठिकाणी घडला.
विशाल दिलीप पैठणे (वय 27 रा भोसरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पीडीतेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या काम करत असलेल्या कंपनीत,कंपनीच्या गेटवर कॅन्टीन, बस स्टॉप अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात अश्लील शेरेबाजी करणे, मोठ मोठ्याने बोलणे पाठलाग करणे, मला काही होणार नाही असा दम देणे अशा प्रकारे पिडीतेचा विनयभंग केला. त्याच्या या छळाला कंटाळून अखेर पीडीतेन चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारी नंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे चिंचवड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत .











































