अश्लील व्हिडिओ बनवून महिलेची बदनामी

0
419

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – महिलेच्या फोटोचा गैरवापर करून तो अश्लिल व्हिडीओसाठी वापरणाऱ्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.7) उघडकीस आला.

40 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून व्हॉटसअप क्रमांक 9649712454 या मोबाईल धराकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या फोटोचा गैरवापर करत आरोपीने संबंधीत मोबाईल क्रमांकावरून सेक्स कन्टेन्ट असलेल्या व्हिडीओ सोबत फोटो पाठवत महिलेची बदनामी केली. यावरून आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.