अश्लील व्हिडिओ पाहत असाल तर सावधान!, नाहीतर…

0
2

दि . १४ ( पीसीबी ) – आजकाल इंटरनेटमुळे कोणतीही माहिती, अगदी लैंगिक व्हिडिओसुद्धा सहज उपलब्ध होतात. स्मार्टफोनमुळे अशा ‘प्रौढ मनोरंजना’चे जग लगेच समोर येते. परंतु, हे व्हिडिओ पाहणे कितपत योग्य आहे आणि त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात, याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे.

अश्लील दृश्यांचे स्वरूप, आकर्षण –

अश्लील चित्रफिती म्हणजे लैंगिक व्यवहार, (Viral Video) नग्नता किंवा कामुक हावभाव दर्शवणारे दृश्यकथ्य. हे प्रामुख्याने मनोरंजनासाठी बनवले जात असले तरी, ते खऱ्याखुऱ्या लैंगिक जीवनापेक्षा पूर्णतः भिन्न असतात. अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते, लैंगिक बाबींबद्दल कुतूहल बाळगणे ही एक नैसर्गिक मानवी भावना आहे, जी विशेषतः किशोरावस्थेत वाढीस लागते.

त्यामुळे, कधीतरी असे व्हिडिओ पाहणे अनैसर्गिक नसले तरी, त्याचे प्रमाण वाढल्यास किंवा सवयीचे रूपांतर व्यसनात झाल्यास ते अत्यंत घातक ठरू शकते. लैंगिक जाणिवांची पूर्तता, जोडीदारासोबत नवीनता शोधणे किंवा तात्पुरता तणाव कमी करणे यांसारखे मर्यादित सकारात्मक उपयोग केवळ काटेकोर नियंत्रण असेल तरच शक्य आहेत.

अशा व्हिडिओंना (Viral Video) सतत पाहिल्याने मेंदूतील ‘डोपामिन’ (Dopamine) या आनंददायी रसायनाची पातळी वाढते, ज्यामुळे कालांतराने अमली पदार्थ किंवा मद्यपानाप्रमाणेच याचे व्यसन जडते. याची परिणती म्हणजे खऱ्या आयुष्यातील लैंगिक संबंधांमधील नैसर्गिक ओढ आणि आनंद कमी होऊ लागतो. या व्हिडिओंमधील लैंगिक क्रिया, शरीरसौष्ठव आणि एकूणच सादरीकरण हे अतिरंजित आणि काल्पनिक असल्यामुळे, प्रेक्षक आपल्या वास्तविक जोडीदाराकडूनही तशाच अवास्तव अपेक्षा बाळगू लागतो, ज्यामुळे संबंधांमध्ये दुरावा व असंतोष निर्माण होतो.

वैयक्तिक, सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम-

जोडीदाराच्या सतत अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या सवयीमुळे नात्यातील विश्वासाला तडा जातो, ज्यामुळे भावनिक संघर्ष, अपमान आणि लैंगिक पातळीवर अंतर येऊ शकते. दीर्घकाळ हे व्हिडिओ पाहिल्यास मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो; नैराश्य, चिंता आणि न्यूनगंड यांसारख्या समस्या वाढू शकतात. इतकेच नव्हे तर, अशा सवयीमुळे नैसर्गिक लैंगिक कार्यक्षमतेवर परिणाम होऊन शीघ्रपतन किंवा कामोत्तेजनेतील अडचणींसारख्या समस्याही उद्भवू शकतात. तसेच, कामावरून व महत्वाच्या ध्येयांपासून लक्ष विचलित होऊन व्यक्तीची उत्पादन क्षमता घटते.

सामाजिक स्तरावर, काही अभ्यास असे दर्शवतात की अश्लील व्हिडिओंच्या अतिसेवनाने लैंगिक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते आणि स्त्रियांकडे केवळ लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बळावतो. यासाठी, पालकांनी मुलांशी लैंगिकतेविषयी खुलेपणाने संवाद साधणे आणि इंटरनेटच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.