वाकड, दि. ६ (पीसीबी) – अश्लील मेसेज करून एका व्यक्तीने महिलेचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना 26 मे ते 5 जून 2022 या कालावधीत वाकड येथे घडली.
संजय उद्धव जाधव (रा. मांगडेवाडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 5) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला व्हाट्सअपवर वारंवार अश्लील मेसेज पाठवले. फिर्यादीला व्हिडीओ कॉल करून त्यांना भेटण्यासाठी बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












































