दि.०१(पीसीसीबी)-कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. अशोक चव्हाण याचे महिलांसबोत लैंगिक कृत्य करतानााचे 58 पेक्षा जास्त व्हिडिओ समोर आले आहेत. मध, चिंचोको, नकली साप, तंत्र मंत्र, ओश्नोजल याच्यामाध्यमातून अशोक चव्हाण याने अनेक राजकीय नेते. IAS अधिकारी, हायप्रोफाईल व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते. अशातच आता अशोक चव्हाण याचा एक अत्यंत धक्कादायक कारनामा समोर आला आहे. नॉनव्हेजचं नावही न घेणाऱ्या जैन समाजाला कॅप्टन अशोक खरातने डायरेक्ट मासे खायला घातले. जैन समाजही अशोक चव्हाण याच्या जाळ्यात अडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भोंदू बाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अशोक चव्हाण याने शाकाहारी लोकांना मासे खाण्यास भाग पाडले. मासा हा पाण्यातली वनस्पती सांगून मासा खाऊ घातला. एसआयटीच्या तपासात भोंदू खरातचे कारनामे उघड झाले आहेत. बंडलबाज खरातचे लोकांना ठगवण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. शाकाहारी असलेल्या अनेकांना मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून प्रसाद म्हणून मासा खाण्यास भाग पाडलं. मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडे नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखो रूपयांची रक्कम लुबाडली. एसआयटीच्या तपासात खरातची बंडलबाजी उघड झाली आहे.
‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख ‘सिद्ध पुरुष’
नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाचा तपास आता राजकीय आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचला. सिन्नरच्या स्टाईस संस्थाचे चेअरमन नामकर्ण आवारे यांचं पुस्तक वादात सापडलंय. या पुस्तकात अशोक खरात यांचा उदो… उदो… करण्यात आलाय. ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख ‘सिद्ध पुरुष’ असा केलाय. खरातच्या चमत्कारांचे याची देही याची डोळा साक्षीदार असल्याचा दावा त्यांनी या पुस्तकातून केलाय. 2012 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालंय. आवारेंनी खरातला चक्क आपला ‘गुरू’ आणि ‘सिद्धपुरुष’मानलंय. एवढंच नव्हे तर खरातने परदेशातून ‘ओशनोलॉजी’मध्ये सुवर्णपदक मिळवल्याचा अजब दावाही या पुस्तकातून करण्यात आला. मात्र, खरात आता बदलल्याचा दावा त्यांनी केलाय. खरातशी आता संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.






































